Farmer Protest News : अन्नदात्यांचं आज ‘उपोषण’

शेतकरी आंदोलनाचा आज एकोणवीसावा दिवस

एमपीसी न्यूज : गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण 14 डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत.

“काही संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत आहे असे चढूनी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.