Todays Horoscope 01 October 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांगवार – शुक्रवार, दि. 01.10.2021

  • शुभाशुभ विचार- 11 प. चांगला दिवस.
  • आज विशेष- दशमी श्राद्ध.
  • राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुष्य.
  • नक्षत्र पाया- चांदी.
  • चंद्र राशी – कर्क.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- पिस्ता)

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. पारिवारिक सुखात वृद्धि होईल. आज वाहन वास्तूविषयी खरेदी विक्री फायदाच राहील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)

आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल.  मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. एखाद्या अडचणीच्या वेळी शेजारीच मदतीला धावून येतील.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यापारी अधिक गुंतवणुकीस प्राधान्य देतील. शेजारी काही क्षुल्लक कारणास्तव नाराज असतील.

कर्क- ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अतिशय स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.

सिंह – (शुभ रंग – हिरवा )

भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाणार आहे.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)

आज आपला मोठेपणा दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च करावा लागणार आहे.  दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. आज दुपारनंतर एखाद्या लाभ होण्याची शक्यता आहे. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील.

तुळ – ( शुभ रंग- नारिंगी)

नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहज घेतलेले निर्णय योग्यच ठरतील. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.

धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)

वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद संभवतात सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्या.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.