Pimpri News: ‘आजादी का अमृत महोत्सव’, सलग 75 तास लसीकरण; कोणतीही नोंदणी न करता मिळणार लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामधील नागरिकांसाठी कोविड-19 लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर देण्यात येत असून शहरामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा” असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी “आजादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कोणतीही नोंदणी न करता न करता आजपासून सलग 75 तास लसीकरण केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाटयगृह, पिंपळे गुरव येथे महापौर  ढोरे यांचे शुभहस्ते करण्यात आला.

“आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर 21 या दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सलग 75 तास कोणत्याही स्वरुपाची पुर्व नोंदणी न करता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाटयगृह, पिंपळे गुरव, रामकृष्ण मोरे नाटयगृह चिंचवड, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी या तीन ठिकाणी करण्यात येणार आहे.

“आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत   हा चांगला उपक्रम आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत कोविड- 19 लसीकरण मोठया प्रमाणात होण्यास मदत होईल असे मत उपमहापौर  हिराबाई घुले यांनी व्यक्त केले. नगरसेविका शारदा सोनवणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, क्षेत्रिय अधिकारी विजय थोरात, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर उपस्थित होते.

“आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत 30 सप्टेंबर 21 ते 3 ऑक्टोंबर 21 या दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरण सलग 75 तास कोणत्याही स्वरुपाची पर्व नोंदणी न करता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाटयगृह, पिंपळे गुरव, रामकृष्ण मोरे नाटयगृह चिंचवड, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी या तीन ठिकाणी करण्यात आलेले असून शहरामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.