Today’s Horoscope 02 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

02.07.2023.

शुभाशुभ विचार- 13 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सायंकाळी 04.30  ते 06.00. 

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 13.18 पर्यंत नंतर मूळ.

चंद्र राशी – वृश्चिक 13.18 पर्यंत नंतर धनु

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

आपल्या कार्यक्षेत्रात फार सावधपणे पावले टाका. कमी कष्टात जास्त लाभाचा मोह टाळा. नव्या उपक्रमाची सुरुवात उद्या करा. दुपारनंतर दैवाची अनुकूलता राहील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. कारण दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही आज जोडीदाराच्या चुका चुकूनही काढू नका, संयम ठेवा.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

नोकरी व्यवसायात अनुकूलता वाढेल. आज काही येणी असतील तर अनपेक्षितपणे वसूल होतील. वैवाहिक जीवनात असलेले काही मतभेद दुपारनंतर नीवळतील.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

रसिक मंडळी आज मौज मजेस प्राधान्य देतील. आजारी व्यक्तींनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा बरा झालेला एखादा आजार उलटू शकेल सतर्क रहा.

सिंह (शुभ रंग- आकाशी )

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने पालक समाधानी असतील. चैनीसाठी खर्च कराल.

कन्या ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक आघाडीवर आज सामंजस्या चे वातावरण असेल. सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. उच्चशिक्षणार्थी मान मोडून अभ्यास करतील.

तूळ ( शुभ रंग- मोतिया)

अथक परिश्रम व वेळेचे योग्य नियोजन यांच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज भासेल. मुलांना अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

तरुण वर्गात चंगळवादी वृत्ती वाढेल. पैशाची उधळपट्टी करण्याचे विविध मार्ग सुचतील. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

जमाखर्चाचा ताळमेळ बसवताना आज थोडी तारेवरची कसरत होईल. परंतु दुपारनंतर अनपेक्षितपणे काही पैसा हाती येईल. हरवलेली वस्तू परत शोधल्यास सापडेल.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. अनावश्यक खर्च कमी करणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादा अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो प्रवास घडणार आहेत.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )

खर्च कितीही वाढला तरी काळजी करू नका, आज दुपारनंतर एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकारी वर्गास आज अधिकार वापरावेच लागतील.

मीन -(शुभ रंग – निळा )

हाडवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करूनच कामे लवकर उरकता येतील. नोकरीत कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान केवळ अशक्य. ज्येष्ठांना सत्संगाकडे पाऊले वळवावीच लागतील.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.