Alandi : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज : मावळ भागात व धरण क्षेत्रात गेले काही (Alandi ) दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांद्वारे शहरात सोशल मिडीयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

Alandi : आळंदी परिसरात वन पर्यटन, ऑक्सिजन पार्क विकसित करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांना निवेदन

ज्या संस्थेतील विद्यार्थी पखवाज-तबला-पेटी वादन सरावासाठी इंद्रायणी घाटावर तसेच इंद्रायणी नदीपात्रात स्नानासाठी येत असतात. त्यावर पावसाळा असल्याने बंदी घालावी. कारण इंद्रायणी नदी पात्रात पावसामुळे पाण्याच्या पातळीत चढ उतार होत असतो. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नागरिकांनी नदीपात्रात उतरून छायाचित्रण करू नये, अशा सूचना अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.