Alandi : आळंदी परिसरात वन पर्यटन, ऑक्सिजन पार्क विकसित करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांना निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदी देवाची (Alandi) परिसरात वन पर्यटन ऑक्सिजन पार्क विकसित करण्याबाबत सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजप किसान मोर्चा सदस्य संजय घुंडरे पाटील यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये वनक्षेत्रामधील ऐतिहासिक ठेवा जपणूक, वन्यजीव पशुपक्षी संरक्षण, पर्यटन स्थळ विकसित करण्यात यावा इ. बाबींचा समावेश आहे.

देहू आळंदी परिसरात आळंदी तीर्थक्षेत्राजवळ वनखात्याची अंदाजे एक हजार एकर वनक्षेत्र आहे. त्याच वनक्षेत्रात पांडवकालीन शिव मंदिर आहे. या शिव मंदिरास वर्षभर पर्यटक व शिवभक्त भेट देतात. तसेच आळंदी हे प्राचीन शिवपीठ असल्याने या भागात अनेक शिवलिंगे आहेत. ही सर्व शिवलिंगे याच वनविभागात स्थापित आहेत. हा सर्व परिसर निसर्गाने नटलेला सुंदर परिसर आहे.

याच परिसरात रोटाईचे तळे ऐतिहासिक आहे. या तळ्याचे पाणी कधी आटत नाही. निसर्गरम्य या क्षेत्रात अनेक वन्यजीव वास्तव्य करतात. सुमारे 400 ते 500 मोर व अनेक पक्षी आहेत. या भागातील औद्योगिक कंपन्या, नागरिक या परिसरात कचरा टाकून हा परिसर ऱ्हास करत आहेत.

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. भटकी कुत्री वन्य शिकारी त्यांची शिकार करतात. यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोरांना व अन्य (Alandi) पशुपक्षांना संरक्षण दिल्यास येथे पर्यटन वाढण्याची खात्री आहे. त्यामुळे शासनाने हा परिसर राखीव करून पर्यटन स्थळ विकसित करण्यात यावे.

Talegaon Dabhade : सर्व रोटरी क्लबने एकत्रितरीत्या मोठे उपक्रम राबवावेत – डॉ. रो शैलेश पाळेकर

तसेच, या भागात शुद्ध पाण्याचे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले कुंड आहेत. त्याचे जतन करून वन्यजीव आणि पर्यटक यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटणार आहे. चाकण हा औद्योगिक भाग असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे.

तसेच, आळंदी देहू या ठिकाणी लक्षावधी भाविक दर्शनास येतात. परंतु, जवळपास एकही पर्यटनस्थळ नसल्याने येथे पर्यटन स्थळ उपलब्ध करून दिले तर येथे सामान्य नागरिक, भाविक, वारकरी यांना त्याचा लाभ घेता येईल. औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा समतोल साधता येईल.

या ठिकाणी अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. त्यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा. तसेच शासनाने देखील या कामी मदत मिळवून द्यावी. अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, श्रीकांत घुंडरे पाटील, जनार्दन पितळे, राहुल गोडसे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.