Talegaon Dabhade : सर्व रोटरी क्लबने एकत्रितरीत्या मोठे उपक्रम राबवावेत – डॉ. रो शैलेश पाळेकर

रोटरी सिटीचा कृतज्ञता व स्वप्नपूर्ती सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील सर्व रोटरी क्लबचे (Talegaon Dabhade) काम हे अतिशय उत्तमरीत्या चालू असून सर्व क्लबने एकत्रितरीत्या मोठे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल डॉ. रो शैलेश पाळेकर यांनी कृतज्ञता व स्वप्नपूर्ती सोहळ्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून केले.

याप्रसंगी नितीन ढमाले, मंगेश गारोळे, विलास काळोखे, सुरेश शेंडे, हरिश्चंद्र गडसिंग हे प्रमुख उपस्थित होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विल्सन सालेर, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष दीपक चव्हाण यादवेंद्र खळदे, दीपक शाह, अलभा पारेख उपस्थित होते.

सर्व रोटरी क्लब तळेगाव शहर व परिसरामध्ये रोटरी क्लब व इनरव्हील क्लबचे नाव सामाजिक कार्यामध्ये उच्च शिखरावर न्यावे व समाजाला रोटरी क्लब विषयी आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने समाजात काम करावे व समाजाची सेवा करावी असे आवाहनही डॉ.रो.शैलेश पाळेकर यांनी केले.

तळेगाव शहरातील सर्व रोटरी क्लब एकत्र व्हावे ही माझी खूप दिवसापासून इच्छा होती व त्यासाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून 25 वर्ष व त्यापेक्षा अधिक काळ ज्यांनी समाजाची सेवा केली. त्यांचा सन्मान करण्याचा मानस मी रोटरी सिटीचा अध्यक्ष झालो त्या दिवसापासूनच केला होता असे उद्गार रो दीपक फल्ले यांनी केले.

याप्रसंगी तळेगाव शहरातील रोटरी क्लब व इनरव्हील क्लब मच्या माध्यमातून समाजाची 25 वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ सेवा केलेल्या 32 सदस्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या संपूर्ण वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेल्या (Talegaon Dabhade) सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

यावर्षीचा बेस्ट रोटरियन ऑफ द इयर हा पुरस्कार रो किरण ओसवाल यांना देण्यात आला. रोटरी सिटीचे अध्यक्ष म्हणून दीपक फल्ले यांनी केलेल्या संपूर्ण वर्षभरातील कार्याबद्दल त्यांना रोटरी सिटीच्या सर्व सदस्यांकडून मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तर पिंकेथोन या उत्तम प्रकल्पासाठी डॉ. धनश्री काळे तर रोटरेक्ट क्लबचे अध्यक्ष वैभव तनपुरे यांनी केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

तर संतोष शेळके, प्रशांत ताय,संतोष परदेशी,प्रदीप मुंगसे,प्रदीप टेकवडे प्रसाद पादिर,मिलिंद निकम,हर्षल पंडित,भगवानराव शिंदे यांना उत्तम डायरेक्टर्स म्हणून सन्मानित करण्यात आले.

प्रकल्प प्रमुख रो दिलीप पारेख यांनी उत्तम नियोजन केले, तर संजय मेहता, शरयू देवळे, रेश्मा फडतरे, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, तानाजी मराठे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उत्कृष्ट निवेदिका दिपाली झंवर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण ओसवाल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.