Today’s Horoscope 03 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 03 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 03.01.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 08.01 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————–

मेष – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.

वृषभ  – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

मिथुन – ( शुभ रंग- राखाडी)

तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. आज गृह सौख्याचा दिवस.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील.

सिंह – ( शुभ रंग – आकाशी)

धनस्थानातील चंद्र भ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

तूळ – ( शुभ रंग- आकाशी)

आज काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

आज हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. काही दुरावलेली नाती जवळ येतील.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नव्या व्यावसायिकांना यशाची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

मकर- ( शुभ रंग – मोतिया)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)

जे काही चाललंय ते बरच चाललंय म्हणावे लागेल. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. सासरवाडी कडून आज एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग- सोनेरी)

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.