Today’s Horoscope 03 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 July 2023
वार – सोमवार.
03.07.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- गुरु पौर्णिमा, व्यासपूजा.
राहू काळ – सायंकाळी 7.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मूळ 11.02 पर्यंत नंतर पूर्वाशाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधावा.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. आज नाकासमोरच चाला. गैरवर्तनाने मानहानी संभवते. आज संध्याकाळी फक्त सत्संगाकडे पावले वळवणे हिताचे राहील.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी)
केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी असेल.

कर्क (शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील येणी वसूल होतील.

सिंह (शुभ रंग- मरून )
आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील प्रिय व्यक्तीस एखादी भेटवस्तू द्याल.

Pune : ​शास्त्रीय गायन आणि सतारीच्या झंकाराने तीन दिवसीय ‘स्वरमल्हार’ महोत्सवाची सांगता

कन्या ( शुभ रंग- आकाशी)
घरगुती लघुउद्योग तेजीत चालतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. आज आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

तूळ ( शुभ रंग- केशरी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया) Today’s Horoscope 03 July 2023
खिशात पैसा खेळता राहील. कमी कष्टात जास्त लाभ पदरात पडू शकतो. काही दुरावलेली नाती जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

मकर ( शुभ रंग- पिस्ता)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल आज प्रवासात खाण्या पिण्यावर ताबा ठेवा अन्यथा आरोग्य बिघडेल.

कुंभ (शुभ रंग – निळा )
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. विरोधक आज मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन -(शुभ रंग – चंदेरी )
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊ नका. मित्रांच्या फार नादी लागू नका.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.