Today’s Horoscope 08 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 08 January 2024
आजचा दिवस – सोमवार.
तारीख 08.01.2024
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – अनुराधा 22.03 पर्यंत.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)
नोकरदारांना वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. कोणतेही धाडस आज नको.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. संध्याकाळी लवकर घर गाठा, पत्नी आतुरतेने वाट पाहत असेल.

मिथुन – ( शुभ रंग- भगवा)
कार्यक्षेत्रातील वाढत्या कामाचा प्रकृतीवर ताण पडेल. वाढत्या महटवाकांक्षांना थोडा ब्रेक लावून तब्येतीकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरांचे फार लाड नकोत.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज प्रेम प्रकरणांना थोडा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. खाण्यापिण्यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. संध्याकाळी पोट बिघडेल.

Chinchwad : मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंह -( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी अनुकूल दिवस असून सर्व महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. आज काही प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. लेखक व कवी मंडळींना आज नवीन कल्पना सुचतील. व्यवसायात जाहिरातींचे सातत्य वाढवावे लागणार आहे.

तूळ ( शुभ रंग- मरून) Today’s Horoscope 08 January 2024
राशीच्या धनस्थानी भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. गृहिणींना काटकसर करण्याची अजिबात गरज नाही. बोलताना मात्र शब्द जपून वापरा.

वृश्चिक ( शुभ रंग – डाळिंबी)
उद्योग धंद्यात तुमचा प्रगती रथ वेगाने घोडदौड करेल. आज काही सज्जन मंडळींच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. जोडीदारास दिलेला शब्द पाळाल.

धनु (शुभ रंग- पांढरा)
आज कंजूस वृत्तीस लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील काही जणांना तातडीने दुरच्या प्रवासास निघावे लागू शकते. आज तुमचा अध्यात्मकडे कल राहील.

मकर- ( शुभ रंग – निळा)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा असून तुमची काही विसरलेली येणी आकस्मिक रित्या वसूल होतील. काही गैरसमजामुळे दुरावलेली नाती ही जवळ येतील.

कुंभ – (शुभ रंग- सोनेरी)
आज नोकरदारांच्या कामाची वरिष्ठांकडून कडून दखल घेतली जाईल. नवीन व्यावसायिकांना यशाची चाहूल लागेल. आज चुकीचा मार्ग दाखवणारे मित्र भेटतील सतर्क रहा.

मीन ( शुभ रंग- जांभळा)
उद्योग व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. नामस्मरणात अजिबात खंड नको.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.