Maval : इंद्रायणी भात पिक वाढीसाठी बीव्हीजी विशेष प्रयत्न करणार

एमपीसी न्यूज – मराठी उद्योजक आणि भारतातील मोठी एकात्मिक सेवा कंपनी (Maval) भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव रामदास गायकवाड यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मावळ मधील तरुणांच्या हाताला रोजगार तसेच कंपनी करत असलेल्या स्वच्छता राखण्याच्या कामापासून ते औषध उत्पादन करणे,आपत्कालीन सेवा पुरवणे,घन कचरा व्यवस्थापन अशा अनेक कामांबाबत चर्चा झाली.

‘भारत विकास’ग्रुपने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत . त्यांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांत 1700 रुग्णवाहिका चालू केल्या आणि १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर 20 मिनिटांत रुग्णवाहिका मिळण्याची सोय केली.जास्त पीक मिळविण्यासाठी आणि कीड काढण्यासाठी त्यांनी संशोधनपूर्वक ॲग्रो सेफ,ॲग्रो मॅजिक आणि ॲग्रो न्यूट्री अशी हर्बल उत्पादने काढून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढोबळी मिरची,भोपळा,आले, डाळिंबे,मिरची,क्रिसेन्थम फुले,पपई, कपाशी या पिकांचा आकार मोठा केला आणि उत्पादन वाढविले.

Chinchwad : मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते.भाताचे उत्पन्न कसे वाढेल, यातून शेतकऱ्यांना जास्त आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार करुन आमदार शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या समवेत चर्चा करून सेंद्रिय पद्घतीने भात शेती कशी करता येईल यासाठी तालुक्यातील दोन ते तीन गावे दत्तक घेणार असल्याचे बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.त्याचप्रमाणे तालुक्यात असणाऱ्या भाकड जनावरांसाठी नवीन संजीवनी देणारी उत्पादने असल्याने त्याचा देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार सुनिल शेळके म्हणाले, मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल, शेतीमध्ये पिकाचे उत्पन्न कसे वाढवता येईल,आपल्या शेतीला जोडव्यवसाय असणाऱ्या दुधाच्या व्यवसायात (Maval) उत्पन्न कसे वाढवता येईल आणि आरोग्यसेवा संदर्भात देखील आपल्या तालुक्याला बीव्हीजीकडुन काही मदत होईल का अशा विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी बीव्हीजीग्रुप आपल्या तालुक्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास तयार झाल्याने त्यांचे मनापासून आभार मानतो.लवकरच गाव निहाय शेतकऱ्यांना जोडून आपली शेती अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार करुयात.

मावळच्या भूमिपूत्रांसाठी रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी बीव्हीजी सारखी मोठी संस्था सहकार्य करणार असल्याने ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.त्यांचे मावळ तालुक्यात स्वागत आहे.लोकप्रतिनिधी म्हणून बीव्हीजी ग्रुपला सर्वतोपरी सहकार्य केले असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.