Today’s Horoscope 11 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  गुरुवार, ​दि​. 11 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – दर्श अमावास्या.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – श्रवण. 14.05 पर्यंत नंतर धनिष्ठा.
  • चंद्र राशी –  मकर.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी )

व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. कामाच्या प्रचंड व्यापामुळे महत्वाच्या घरगुती प्रश्नांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची आपल्यावर मर्जी आहेच अशा भ्रमात राहू नका.

वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

वडिलधार्‍यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास लगाम घालणे हिताचे राहील.

मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. न मागता सल्ले देणारी बरीच मंडळी भेटतील. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. आज तुमच्या खर्चिक स्वभावामुळे पैसा कितीही आला तरी पुरणार नाही.

सिंह – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )

 हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचा मोह होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजू नका.  भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊ नका. काही येणी असतील तर मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)

काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. पैसा येण्या ईतकेच पैसा जाण्याचे ही मार्ग प्रशस्त असतील.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

कुटुंबियांना अभिमान वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून आज घडेल. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. मुलांचे हट्ट पुरवाल.

वृश्चिक –  ( शुभ रंग- जांभळ)

बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेली मेल्स येतील. आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकली ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या प्रसंगी शेजाऱ्यांची गरज लागेल.

धनु – (शुभ रंग – मोरपिशी)

आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण होत असल्याने अनपेक्षित पैशाचे आगमन होईल. तुमची भाग्योदयाकडे यशस्वी वाटचाल होईल.

मकर – ( शुभ रंग – मरून)

आज तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून निस्वार्थीपणे काही कामे कराल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. अनेक अवघड कामे सोपी होतील. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

कुंभ – ( शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. आज देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्हाला काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. उद्योगधंद्यात प्रगतीरथ वेगवान राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.