Today’s Horoscope 11 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार, दि. 11 मे  2021

  • शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — दर्श अमावास्या.
  • राहू काळ – सकाळी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल –  उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – भरणी 23.31 पर्यंत नंतर कृतिका
  • चंद्र राशी –  मेष.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – जांभळा)
आज तुमच्या एखाद्या आवडत्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. पैशाची अडचण दूर होईल. आज जोडीदाराचे मन जिंकाल. एखादा विवाह जुळवण्यात मध्यस्थी कराल.

वृषभ – (शुभ रंग – निळा)
व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढती राहिल. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. घरात थोरांशी मतभेद होऊ शकतात.

मिथुन – (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील जे मनी योजाल ते तडीस न्याल. इतरांनाही कामात मदत कराल. गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.

कर्क – (शुभ रंग – मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठांकडून आज सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. कुटुंबीयांची मात्र नाराजी पत्करावी लागेल.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. आज देवही नवसाला पावेल.

कन्या – (शुभ रंग – राखाडी)
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा अत्यंत कंटाळवाणा दिवस असून आज तुम्हाला एखाद्या सत्संगाची गरज भासेल.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. आज विरोधक माघार घेतील.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
कार्यक्षेत्रात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश वाटते तेवढे सोपे नाही. ज्येष्ठांनी क्षुल्लक वाटणारी दुखणी ही अंगावर काढू नयेत.

 

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. गरजूना आपण होऊन मदत कराल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर – (शुभ रंग – क्रीम)
आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. मागण्या पूर्ण झाल्याने आज बच्चेकंपनी खुश असेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)
आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शेजार्‍यांशी असलेले मतभेद सुसंवादाने दूर होतील.

मीन – (शुभ रंग- मोतिया)
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील. नवीन परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.