Pune News : संगीतसंवर्धक कृष्णा गोपाळ धर्माधिकारी यांचे निधन

एमपीसी न्यूज – गायन, वादन व नृत्य या संगीतातील तिन्ही शाखातील नवोदित व प्रथितयश कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्‍या ‘गानवर्धन’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृष्णा गोपाळ उपाख्य कृ. गो. धर्माधिकारी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

_MPC_DIR_MPU_II

अभिजात संगीताच्या संवर्धनासाठी गेली 43 वर्ष अविरतपणे कार्य करणार्‍या धर्माधिकारी यांचा जन्म 01 जून 1934 रोजी झाला. गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दोन हजारहून अधिक कलाकारांना सादरीकरणाची संधी दिली.

प्रतिमहा 1 याप्रमाणे वर्षाला सरासरी 14 कार्यक्रम असे गेली 42 वर्षे सातत्याने आयोजन केले. त्याचे संयोजन हे वैशिष्ट्यपूर्ण असे. संगीतसाधकांच्या चिंतनात भर पडावी, म्हणून “मुक्त संगीत चर्चासत्राच्या माध्यमातून पं. जसराज, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया, रामनारायण, हृदयनाथ मंगेशकर, किशोरी आमोणकर, रोहिणी भाटे, प्रभा अत्रे अशा प्रतिभावंत कलाकारांचा या चर्चासत्रात सहभाग होता. या चर्चासत्रावर आधारित ‘मुक्त संगीत संवाद’ हा मराठी, हिंदी व इंग्रजी असे तीनही ग्रंथ प्रकाशन हे त्यांचे महत्त्वाच्या सांगीतिक कार्य होते. तसेच अक्षय रेमिडिज या औषध कंपनीचे ते डायरेक्टर म्हणूनही कार्यरत होते. त्याच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नातवंड, पतवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.