Today’s Horoscope 12 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, शनिवार, दिनांक…12 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… अनिष्ट दिवस.
  • आज विशेष .. दशमी श्राद्ध.
  • राहूकाळ…दुपारी 09.00 ते 10.30
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… आद्रा 16.25 पर्यंत, नंतर  पुनर्वसु.
  • आजची चंद्र राशी… मिथुन

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग- राखाडी )

भावनेच्या भरात इतरांना दिलेले शब्द पाळावे लागतील आज काही प्रवास होणार आहेत, मौल्यवान ऐवज सांभाळायला हवा. शेजारी आपुलकीनेच डोकावतील.


वृषभ(शुभ रंग – लेमन)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह जाणवेल. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही.

 

मिथुन(शुभ रंग -पिस्ता)

महत्त्वाची कामे आज दुपारपूर्वी उरकून घेतलेली बरी.  थोडी अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल येतील. आज जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

 

कर्क(शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

जरा काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनी ही राग अनावर होईल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्याच बऱ्या. हट्टी पणास थोडा लगाम घालणेही गरजेचे आहे

 

सिंह(शुभ रंग- लाल)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील उत्साह इतरांस प्रभावित करेल. संध्याकाळी अचानक एखादा धनलाभ संभवतो. आज संध्याकाळी प्रिय मित्रांचा सहवासात रमाल.

 

कन्या(शुभ रंग- चंदेरी)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक थोडे नमते घेतील. श्रमसफल्याचे समाधान मिळवाल. घरातील मोठ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

 

तूळ(शुभ रंग- आकाशी)

आज तुम्हाला दैनंदिन कामातही काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. सत्संगानेच मानसिक सामर्थ्य वाढेल. दैव साथ देईल.

 

वृश्चिक(शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक गोष्टींवरून मानसिक संतुलन बिघडू शकेल. आज तुमच्या काही नकारात्मक विचार मनात येतील. महत्त्वाची कामे उद्यावर ढकललेली बरी.

 

धनु(शुभ रंग- जांभळा)

आज तुमची तब्येत ठणठणीत राहील प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. अडचणीच्या प्रसंगी एखाद्या मित्राच्या मदतीस धावून जाल. वैवाहिक जीवनात सौख्य राहील.

 

मकर(शुभ रंग – निळा)

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. महत्त्वाचे काही व्यावसायिक करार करायचे असतील तर दुपार नंतरच करा. वाद विवादात आपलेच घोडे पुढे दामटवाल.

 

कुंभ(शुभ रंग- पांढरा)

अपेक्षित आर्थिक लाभ होतील आवडत्या छंदातून चांगली कमाई होणार आहे. आज प्रकृती उत्तम साथ देईल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर ची चव चाखता येईल.

 

मीन(शुभ रंग- मोरपंखी)

कौटुंबिक स्तरावर आनंदी दिवस. काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. आज मुले अगदी आज्ञाधारक पणे वागतील.
खेळाडूंना सराव वाढवावा लागेल

 

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.