Today’s Horoscope 15 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 15 February 2024
आजचा दिवस – गुरुवार.
तारीख – 15.02.2024
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – अश्विनी 9.26 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————–
मेष – ( शुभ रंग – तांबडा)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुठेही आपलीच मर्जी चालवायचा तुमचा प्रयत्न राहील. एखाद्या क्षुल्लक गोष्टीने तुमचे मन हळवे होईल. आज थोडे वास्तवतेचे भान असू द्या.

वृषभ ( शुभ रंग- निळा)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवास कराल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज जसे चिंताल तसेच होईल. अति स्पष्ट वक्ते पणा टाळा.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
मित्रमंडळींना दोन हात लांबच ठेवून तुम्ही आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकांनाही तुमचे विचार प्रभावित करतील.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी)
नोकरी धंद्याच्या दृष्टीने काहीसा विरोधी दिवस आहे. आज आक्रमकता कामाची नाही. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. नास्तिक ही आज देवाला नवस बोलतील.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा) – Today’s Horoscope 15 February 2024
आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध असावे. घरात जोडीदाराच्या कलाने घ्या. नव्या उपक्रमाची सुरुवात उद्यावर ढकललेली बरी.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही प्रचंड उत्साही व आशावादी असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावात येईल. उद्याची कामे शक्य झाल्यास आजच उरकून मोकळे व्हा.

वृश्चिक ( शुभ रंग – आकाशी)
आज काही जुन्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. आज तुम्हाला विश्रांतीची ही गरज भासेल. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. कुसंगत टाळणे हिताचे राहील.

धनु (शुभ रंग- भगवा)
कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. आज तरुण मंडळी व्यक्तिमत्व विकासावर भर देतील.

मकर (शुभ रंग- क्रीम)
प्रॉपर्टी विषयक रखडलेली कामे गती घेतील. विविध गृह उद्योगातून गृहिणींना आज चांगली कमाई होईल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. व्यस्त दिवस.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची वणवण होईल. आज कदाचित वाहन रस्त्यात रुसून बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा. शेजाऱ्यांशी असलेले मतभेद दूर होतील.

मीन ( शुभ रंग- मोतिया)
विविध मार्गाने आलेला पैसा खर्च करण्याचेही विविध मार्ग तुम्हाला सुचतील. नेते मंडळींच्या वक्तृत्वाने आज कार्यकर्ते प्रभावित होतील. शब्दांचा वापर जपून करावा.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 968916542

Pune : खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा; अजित पवार यांचे निर्देश

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.