Today’s Horoscope 18 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

18.07.2023

शुभाशुभ विचार – मलमासारंभ. 

आज विशेष- करीदिन

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- चंदेरी )

जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना कठीण विषयातही गोडी निर्माण होईल. आज गृहिणींना मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यावे लागेल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

आज दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

मिथुन ( शुभ रंग- भगवा )

आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळलेले बरे.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करून घ्या. अडचणींच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील. कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशा पदरात पडू शकते.

सिंह (शुभ रंग- लाल )

आज तुमच्यातील मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शेअर्सच्या व्यवहारातील तुमचे अंदाज खरे ठरतील.

तूळ ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी सलोखा वाढेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. संध्याकाळी प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांच्या शब्दाचा तुम्ही मान राखाल. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील त्यांना दुरूनच रामराम करा.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. हीत शत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- हिरवा )

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

मीन -(शुभ रंग- मरून)

नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास योग्य संधी चालून येतील. आज नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.