Pavana Dam update :  पावसाचा जोर वाढला; धरणात 35 टक्के पाणीसाठा झाला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.  गेल्या 24 तासात केवळ 98 मिली मीटर पावसाची नोंद (Pavana Dam update) झाली आहे.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

Today’s Horoscope 18 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 98 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  834 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  673 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 35.29 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 65.35 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 1.86 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 17.39  टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.