Maharashtra : उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान विभागाने मुंबईसह (Maharashtra) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार 18 जुलै 2023 रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

तसेच 21 जुलै 2023 पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

Pimpri : आधुनिक तंत्रज्ञान वास्तु रचनेस उपयुक्त – आर्किटेक्ट अभय पुरोहित

या (Maharashtra) काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 तर काही ठिकाणी तो ताशी 55 किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.