Today’s Horoscope 21 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 21.12.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस. 

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30  ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – रेवती 22.09 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी – मीन 22.09 पर्यंत नंतर मेष.

—————————–

मेष  ( शुभ रंग – गुलाबी )

आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. घरात मोठ्यांची मने जपावी लागतील. कोणत्याही क्षणिक मोहात अडकू नका.

वृषभ ( शुभ रंग- पांढरा)

जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. दिवस लाभाचा.

मिथुन   ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठ खुश असतील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

कर्क   ( शुभ रंग – मरून)

आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यायला हवे. वाहतुकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल.

सिंह  ( शुभ रंग – पिस्ता)

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज विश्वासू मित्र ही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकावीत. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण असावे.

कन्या   ( शुभ रंग- क्रीम)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

तूळ  ( शुभ रंग- जांभळा)

आज काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

वृश्चिक  ( शुभ रंग – निळा)

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल.

धनु  (शुभ रंग- आकाशी)

धंद्यातील येणे वसूल होईल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेणे तुम्हाला चांगले जमेल. गरजूंना मदत कराल.

मकर  ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेतले जातील. प्रवासात आज काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

कुंभ  (शुभ रंग- डाळिंबी)

कठोर बोलण्याने नाती दुरावतील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. आवक मनाजोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मीन  ( शुभ रंग- केशरी)

मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. एखादी किरकोळ गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. जशास तसे या धोरणाने वागा. आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.