Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ( Express Way) आज ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी (दि. 21) दुपारी 12 ते 2 या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर अमेटी युनिर्व्हसिटी (किलोमीटर 10/750) आणि मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान (किलोमीटर 29/200) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. आज गुरुवार (दि. 21) दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील.

Today’s Horoscope 21 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा किमी 8.200 येथून वळवून एनएच 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट किमी 42.000 येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील,

तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( Express Way) दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.