Railway : आळंदी रेल्वे स्थानकात रेल्वेला लागली आग;  त्यानंतर घडलं असं काही….

अन् रेल्वे कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला

एमपीसी न्यूज – कोल्हापूर-पुणे पॅसेंजर (यात्रा विशेष गाडी क्रमांक 02012) रेल्वेला ( Railway) आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे रेल्वे स्थानकातून अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी रवाना झाली. विविध बचाव पथके घटनास्थळी आली अन् ही घटना प्रत्यक्ष आगीची नसून केवळ मॉक ड्रील असल्याचे समजताच उपस्थित सर्वांचा जीव भांड्यात पडला.

पुणे-सातारा रेल्वे मार्गावर आळंदी येथे कोल्हापूर-पुणे पॅसेंजर स्पेशल ट्रेनच्या ( Railway) स्लीपर S-1 डब्याला आग लागल्याची माहिती आळंदी स्टेशन मास्तरांनी गुरुवारी (दि. 20) दुपारी 15.25 वाजता पुणे नियंत्रण कक्षाला दिली.  अपघाताचा संदेश मिळाल्यानंतर विभागीय नियंत्रण कक्षाकडून सर्व विभागांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून 15.45 वाजता अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.

अपघातग्रस्त डब्यातील प्रवासी गेले. माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुरानी दुबे आणि विभागीय संरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार, वैद्यकीय पथक आणि रेल्वे सुरक्षा दलासह तत्काळ अपघातस्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघाताची माहिती एनडीआरएफ, एमसीओ, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागालाही देण्यात आली. सर्वजण अवघ्या अर्ध्या तासात आपापल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले.

Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक

धावत पळत आलेल्या सर्व अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना हे ‘मॉक ड्रिल’ सांगण्यात आले. त्यानंतर सर्व पथकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर मॉक ड्रीलमध्ये डब्यात अडकलेल्या प्रवाशांना विविध उपकरणांद्वारे बाहेर काढणे, त्यांना रुग्णालयात नेणे, प्राथमिक उपचार करणे आदींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सर्व विभागांची तत्परता पाहून मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी धनंजय नाईक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी मुख्यालयातील उपमुख्य संरक्षा अधिकारी व्ही.बी.पाटील, एनडीआरएफचे उपकमांडंट श्री. प्रवीण, विभागीय संरक्षा अधिकारी पुणे देवेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक  डॉ. सजीव, अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निती आहुजा आणि त्यांची टीम व विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. एकूण 210 कर्मचारी, अधिकारी, पोलीस, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित ( Railway) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.