Pune :कलापिनी मध्ये रंगली नाटयवाचन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – कलापिनीत नाटय वाचन कार्यशाळेचे (Pune)आयोजन१७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. श्री राजेंद्र पाटणकर, डॉ अनंत परांजपे आणि डॉ. विनया केसकर यांनी या कार्यशाळेत मौलिक मार्गदर्शन केले.

वाचिक अभिनय म्हणजे अभिनय क्षेत्रातील पहिली पायरी आहे असे डॉ. अनंत परांजपे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.नटराज पूजन करून डॉ अनंत परांजपे यांनी प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र पाटणकर आणि डॉ विनया केसकर यांची ओळख करून दिली.

डॉ विनया केसकर यांनी संहिता निवडी पासून नाट्य वाचनासंदर्भात (Pune)अनेक टिप्स दिल्या. सादरीकरण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, फेशियल एक्सप्रेशन्स मधून कसे व्यक्त व्हावे, वाचन करताना हातांच्या हालचाली करू नयेत, माईक वापराचे तंत्र, नियमित वाचनाचा सराव करावा, नित्य निरीक्षण करावे असे मोलाचे मार्गदर्शन करताना उत्कृष्ट नाटय वाचनाचे सादरीकरणही केले.

Pimpri : कामकाजात हयगय खपवून घेतली जाणार नाही; अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांचा इशारा

आकाशवाणी केंद्राचे माजी प्रमुख श्री. राजेंद्र पाटणकर यांनी वाचताना पॉझेस घेताना कुठे आणि कसे घ्यावेत अन्यथा वाक्यार्थ कसा बदलतो हे सोदाहरण देऊन स्पष्ट केले. करुणा देव, विनय आपटे, पु. ल. देशपांडे, बाळ कुरतडकर, विजय तेंडुलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचे आकाशवाणी केंद्रावरील यूट्यूब वरील कार्यक्रम आवर्जून ऐकावेत, नियमित वाचन करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

डॉ अनंत परांजपे यांनी नाटय वाचन करताना लांब पल्ल्याची वाक्ये वाचताना श्वास पुरण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करावा, श्वास रोखून श्र्लोक म्हणण्याचा सराव करावा असे अनमोल मार्गदर्शन करून त्याचा सरावही करून घेतला. शिवाय आपल्या आवाजातून जवळचे आणि लांबवरचे अंतर तसेच, कमी अधिक उंची दाखवतानाचे अंतर कसे असते याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे प्रशिक्षणही दिले.

ही कार्यशाळा अतिशय रंजक आणि मार्गदर्शक ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले. जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या नाटयवाचन स्पर्धेसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली. मधुवंती रानडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री अशोक बकरे, श्री रामचंद्र रानडे आणि श्री श्रीपाद बुरसे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. चिंचवड, खेड, लोणावळा येथील प्रशिक्षणार्थींनी देखील कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.