Pune : अटक टाळण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस फौजदारास रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज : गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक पोलीस फौजदारास रंगेहात पकडण्यात (Pune) आले. ही घटना शिरूर पोलिस स्टेशन येथे घडली असून शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

या प्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली असून लोकसेवक राजेंद्र दगडू गवारे (वय 53 वर्ष ,सहायक पोलीस फौजदार, नेमणूक -शिरूर पोलीस स्टेशन) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Pimpri : कामकाजात हयगय खपवून घेतली जाणार नाही; अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांचा इशारा

आज तहसीलदार कचेरी कार्यालयाच्या समोरील हॉटेल मित्रधनमध्ये राजेंद्र गवारे यांना लाच घेताना अटक करण्यात आली. अधिक माहिती अशी, की तक्रारदार व त्यांच्या  मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाणे येथे दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये या दोघांची अटक (Pune) टाळण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोड़ी अंती 10,000 रुपये ठरवून हे दहा हजार रुपये  पंचा समक्ष स्वीकारल्यावर लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, पोलिस शिपाई  आशिष डावकर, चालक पो. हवा. काकडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.