Pimpri : कामकाजात हयगय खपवून घेतली जाणार नाही; अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांचा इशारा

एमपीसी न्यूज – ड्रीप सिस्टीम बसवून घेऊन झाडांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल यादृष्टीने विद्युतजोडसह (Pimpri) आवश्यक खबरदारी घ्यावी. झाडांची काळजी घ्यावी. मोठे रस्ते, उद्यानामधील कामकाजात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांनी संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना दिला.

अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता औंध-रावेत रस्त्यावरील औंध ते जगताप डेअरी रस्त्यामधील उद्यान विभागामार्फत सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उद्यान विभाग, विद्युत विभाग, उद्यान (स्थापत्य) विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Pimpri : सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शोभिवंत रोपांसह वड, पिंपळाची वृक्ष लावावी. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या रोपांच्या जागेमध्ये पडलेला राडारोडा उचलावा. झाडांची वाढ होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. ड्रीप सिस्टीम बसवून घ्यावी. झाडांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल यादृष्टीने वीजजोडासह आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच वृक्षारोपण संदर्भातील सर्व उर्वरित कामे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शनिवार अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी दिल्या. महापालिकेतील विविध मोठे रस्ते, उद्याने यामधील कामकाजाबाबत महिन्यातून एकदा आढावा घेण्यात येणार आहे. विभागप्रमुख यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. कामकाजात कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिकेची शहरात विविध 105 उद्याने आहेत. सर्व उद्यानांचा आढावा घेण्यात येत आहे. हिवाळ्यामध्ये उद्यानांमध्ये फिरण्यासाठी येणा-या नागरिकांची गर्दी मोठ्या (Pimpri) प्रमाणात आहे. उद्यानांमध्ये स्वच्छता, शौचालय स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.