Today’s Horoscope 21 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

21.06.2023.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00  ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- गुलाबी )

आज गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी )

कार्यक्षेत्रात आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

कर्क (शुभ रंग- लाल)

आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

आज काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावाच लागणार आहे. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येतीस जपा.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.

तूळ ( शुभ रंग- भगवा)

तुमच्या कार्यक्षेत्रातील अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. अतिव्यस्त दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा)

तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. ज्येष्ठ मंडळी आज सत्संगात रमतील.

धनु- (शुभ रंग- तांबडा)

आज जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच रहा. जोडीदार सांगेल तेच आज योग्य असेल.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्थी कराल.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)

नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी )

आज सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्च शिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.