Daund : कौटुंबिक वादातून पत्नी व दोन मुलांचा खून करुन डाॅक्टरची आत्महत्या

एमपीसी न्यूज –  कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नी व दोन मुलांचा खून करुन डाॅक्टरने ( Daund ) आत्महत्या केल्याची  घटना दौंड शहर परिसरात घडली.

डाॅ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42 ), पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), आदिवत अतुल दिवेकर (वय 9), वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

अतुल दिवेकर आणि कुटुंबीय दौंड शहरातील वरवंड परिसतील चैत्राली पार्क सोसायटीत राहायला होते. डाॅ. दिवेकर पशूवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका आहे. मंगळवारी दिवसभर दिवेकर कुटुंबीयांचा घराचा दरवाजा बंद होता.

Today’s Horoscope 21 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा वाजविला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा डाॅ. अतुल यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. शेजारीच पल्लवी यांचा मृतदेह सापडला. त्यांचा गळा दोरीने आवळून खून करण्यात आला होता.

या घटनेची माहिती दौंड पोलिसांना कळविण्यात आली.  डाॅ. अतुल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली.

‘मी आत्महत्या करत असून पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत’, असे डाॅ. अतुल यांनी चिठ्ठील लिहिले होते.

पोलिसांच्या पथकाने त्वरीत चैत्राली पार्क परिसरात असलेल्या विहिरीजवळ धाव घेतली.  विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.