Today’s Horoscope 23 July 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – शनिवार. ( Today’s Horoscope 23 July 2022)

            

शुभाशुभ विचार – 19.00 नंतर दिवस.

आज विशेष — सामान्य दिवस. 

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – कृतिका 19.03 पर्यंत नंतर रोहिणी.

चंद्र राशी –  वृषभ.

_________________________

 आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. सज्जनांचा सहवास लाभेल.

 

वृषभ- ( शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे.

 

मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )

तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही चांगलाच प्रभाव पडेल. अधिकाराचा गैरवापर टाळा.

 

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस उत्तम आहे.

 

सिंह -(शुभ रंग – डाळिंबी)

नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.

 

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

शासकीय कामे रखडतील. तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील. महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेतल्यास ते चुकतील.

 

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करताना आपल्या मर्यादा ओळखा.

 

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.

 

धनु- ( शुभ रंग- भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

 

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

 

कुंभ- (शुभ रंग- क्रीम)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

 

मीन- ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. महत्वाची मेल्स येतील. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल.

 

!! शुभम भवतु!!

 

श्री जयंत कुलकर्णी. 

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.