Today’s Horoscope 23 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 22 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
वार – सोमवार.
२३.१०.२०२३.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- नवमी उपवास.
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण १७.१४ पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर.
————————————
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
नोकरदारांना आज अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. घरात आज वडीलधारी मंडळीही आपलेच खरे करतील. आज सरकारी नियम मोडणे अंगाशी येऊ शकते शिस्त पाळा.
वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी दिवस आहे. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच करा. वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. आज देव नवसाला पवेल.
मिथुन ( शुभ रंग- सोनेरी)
व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आज घरगुती निर्णय घेताना जोडीदाराचे मत नक्की घ्या. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.
कर्क (शुभ रंग- चंदेरी )
कार्यक्षेत्रात आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मक रित्या पार पडतील.
सिंह (शुभ रंग- हिरवा)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. दुकानदारांची उधारी वसूल होऊ शकेल. तब्येत सांभाळा आज विश्रांतीही गरजेची आहे.

कन्या ( शुभ रंग- लाल )
कला क्षेत्रात नवोदिकांना उत्तम संधी मिळतील. खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. व्यक्तिमत्व विकासावर आज भर द्याल.
तूळ ( शुभ रंग- आकाशी)
स्थावर प्रॉपर्टी विषयक खरेदी विक्रीची रखडलेली कामे गती घेतील. गृहिणी घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतील. मुले आज मन लावून अभ्यास करतील.
वृश्चिक (शुभ रंग- निळा)
आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात आज पालकांनीही डोकावणे गरजेचे राहील.
धनु- (शुभ रंग- क्रीम )
कार्यक्षेत्रातील तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. पैशाअभावी रखडलेले पूर्वीचे उपक्रम सुरू करू शकाल. सहजच घेतलेले निर्णयही आज योग्य ठरतील.
मकर ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. तुमचे कामातील समर्पण इतरांना प्रेरणा देईल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने आज कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल.
कुंभ (शुभ रंग – जांभळा )
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. आज काही महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. इतरांवर अवलंबून राहू नका स्वावलंबन कमी येईल.
मीन -(शुभ रंग – मोरपंखी )
कोणत्याही नवीन कामात सुरुवात करण्यासाठी आज अति उत्तम दिवस. काही अनपेक्षित लाभ तुमचा उत्साह वाढवतील. आज इतरांना दिलेले शब्द पाळता येतील.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.