Today’s Horoscope 24 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

24.04.2023 .

शुभाशुभ विचार- साधारण दिवस.

आज विशेष- विनायक चतुर्थी.

राहू काळ – सकाळी 07.30  ते 09.00.

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग.

चंद्र राशी – वृषभ 13.13 पर्यंत नंतर मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी आज जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मानसिक स्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

आज हार्ड वर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल. स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

जे चाललंय ते छानच चाललय म्हणा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ मिळणार आहे.

मकर ( शुभ रंग- केशरी )

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी अशी कामगिरी तुमच्याकडून होईल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यायला हवे.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल आज घरात सज्जनांची उद्देश राहील गृहिणी स्वतःचे छंद जपतील जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. आज  गृहसौख्याचा दिवस.

मीन -(शुभ रंग – हिरवा )

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क- 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.