Charholi : स्वरूपवर्धिनीच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज़-चऱ्होली येथे स्वरूपवर्धिनीच्या वतीने उभारण्यात (Charholi) आलेल्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या अखिल भारतीय उपाध्यक्षापद्मश्री निवेदिता भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे देखील उपस्थित होते.

या उद्घाटनाच्या निमित्ताने पद्मश्री निवेदिता भिडे यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्या म्हणाल्या  की, राष्ट्राला वैभवशाली करून पूर्ण विश्वाला प्रत्येक राष्ट्रानेयोगदान दिले पाहिजे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं; त्याप्रमाणे आपल्या राष्ट्राला सक्षम करण्याचे जे पहिले काम आहे, ते ‘स्व’रूपवर्धिनीमध्ये अत्यंतसमर्पित भावनेने कृष्णराव पटवर्धन यांच्यापासून प्रत्येक कार्यकर्ता करत आहे.

 

त्यांच्या ध्येय, तपस्येची  परंपरा म्हणजे हे भवन आहे. हा तपप्रवाह सतत सुरू राहिलापाहिजे म्हणजे भवनाचा उद्देश सफल होईल आणि त्याकडेच ‘स्व’-रूपवर्धिनीची वाटचाल होताना दिसत आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचून त्यांनाआत्मनिर्भर करण्याचा हा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे.

Pimpri : सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते!” जागतिक पुस्तकदिनानिमित्त चिंचवडगावात पुस्तक प्रदर्शन

संस्थेचे अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी प्रशिक्षण केंद्र हे केवळ चऱ्होली साठी नव्हे तर शहरासाठी देशासाठी महत्त्वाचेअसल्याचे सांगितले. आज आपण ‘इंडिया@75’ ऐवजी ‘भारत@75’ म्हणायला पाहिजे, कारण 70 टक्के भारत गावात व 17 टक्के भारत वस्ती भागात राहतो; हा फरक भरून काढायला हवा. स्वप्न ‘इंडिया@75ची’ पाहिली आणि भारत तिथेच राहिला तर योग्य होणार नाही, असे मत त्यांनी मांडले.

समाजामध्ये संतुलन आणणे, संधी निर्माण करणे, जातरहित भारत तयार करणे, सहज शिक्षण देणे, सुरक्षित भारत देणे, असे काम ‘स्व’-रूपवर्धिनी करत आहे, याचा आनंद असल्याचीभावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

‘स्व’रूपवर्धिनीच्या वतीने ग्रामीण तरुण तरुणींना तसेच महिलांना प्रशिक्षित करण्याच्या हेतूने तीन मजली भव्य वास्तूच्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. पॅरामेडिकल कोर्सेससह, बेसिक रोबोटिक्स डिझायनिंग तसेच पीसीबी फॅब्रिकेशन, रॅपिड प्रोटो टायपिंग, पायथोन हार्डवेअर, फॅशन डिझायनिंग, नर्सिंग आणि कथकनृत्य प्रशिक्षण असे अभ्यासक्रम जून पासून सुरू होत आहेत.

सुमारे 35000 स्क्वेअर फुटच्या या इमारतीमध्ये अद्ययावत सुविधा पुरवल्या गेल्या आहेत.

या कार्यक्रमाला प. महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब  जाधव, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संस्थापक व ‘स्व’-रूपवर्धिनीचे उपाध्यक्ष विवेक सावंत,माजी महापौर नितिन काळजे हे देखील (Charholi) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.