_MPC_DIR_MPU_III

Today’s Horoscope 26 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  शुक्रवार, ​दि​.26 फेब्रुवारी 2021

_MPC_DIR_MPU_IV
  • शुभाशुभ विचार – 16 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – संध्याकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा 12.35 पर्यंत, नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क 12.35 पर्यंत, नंतर सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

जमीन जुमला शेतीवाडी व वास्तू खरेदी विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केल्याने यश सोपे होईल. आज गृहसौख्याचा दिवस. आज संध्याकाळी सहकुटुंब मस्तच चैनु कराल.

वृषभ – ( शुभ रंग – मरून )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. बेरोजगारांना इंटरव्यू साठी बोलावणे येईल. समाजिक कार्य करणाऱ्यांना समाजात आदर मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील.

मिथुन – ( शुभरंग- निळा )

पैशाची आवक पुरेशी असल्याने मनसोक्त खर्च कराल. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस.

कर्क – ( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. तुमची पैशाअभावी रखडलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत.

सिंह – (शुभ रंग- आकाशी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. आज तुम्ही आधुनिक राहणीमानावर पैसा खर्च कराल. हरवलेली एखादी वस्तू दुपारनंतर परत शोधा म्हणजे सापडेल.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

हाती पैसा असला तरी तो जपून वापरा. दुपार नंतर न टाळता येणारा एखादा मोठा खर्च करावा लागेल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल. महत्वाच्या चर्चा बैठकी दिवसाच्या पूर्वार्धात उरका.

तूळ – ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. वाढत्या व्यस्ततेमुळे घरगुती समस्या दुर्लक्षित होतील. दुपारनंतर एखादा अनपेक्षित लाभ संभवतो. आज वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज बेकायदेशीर व्यवहार टाळा. फक्त नाकासमोर चालणं हिताचे राहील.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होतील पण फार ताणून धरू नका.

मकर – ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा. महत्त्वाची बोलणी तसेच मोठे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या.

कुंभ – ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. नोकरदारांनी वरिष्ठांशी वागताना बोलताना मर्यादा पाळाव्यात. विरोधकांना चहा पाजुनच स्वार्थ साधून घ्यावा.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठांनी अति दगदग टाळून तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे.   तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल. सावध रहा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.