Pune News : पीएमपीएमएल’ च्या 9 हजार 498 कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 हजार 498 कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

संचालक मंडळाच्या बैठकीला पिंपरी चिंचवड महापौर उषा (माई) ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीएमएल संचालक शंकर पवार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएल संचालक राजेंद्र जगताप, तसेच पीएमपीएमएल संचालक मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पीएमपीएमएलच्या 9 हजार 498 कामगारांना याचा फायदा होणार आहे. यासाठी एकूण 325 कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका 60 टक्के म्हणजेच 195 कोटी रुपये तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 40 टक्के म्हणजे 130 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाचा निर्णय सन 2017-18 पासून लागू होणार आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

महापौर मोहोळ म्हणाले, सातव्या वेतन आयोगासोबतच पीएमपीएमएल ताफ्यात दोन प्रकारच्या बसेस प्रक्रियेत 29 डिसेंबर 2021 पर्यंत 500 बसेस संचालक मंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या फेर दोन योजनेअंतर्गत 12 मीटर च्या 150 ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 63.95 रुपये प्रति/किमी दराने घेण्यात येत आहेत. यामधील 75 बसेस 25 सप्टेंबर 2021 पर्यंत, तर उरलेल्या 75 बसेस 29 डिसेंबर 2021 पर्यंत रस्त्यावर उतरतील. केंद्र सरकार एका बसला 55 लाखांचे अनुदान या फेर योजनेंतर्गत देणार असून, त्याचे एकूण 82 कोटी रुपये बसेससाठी मिळणार आहेत, त्यातील 16.5 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

आणखी 350 इलेक्ट्रिकल बसेस भाडेतत्त्वावरती 67.40 रुपये प्रति/किमी दराने रस्त्यावरती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील 28 मे 2021 पर्यंत 75 बसेस, 27 जून 2021 पर्यंत 75 बसेस, 27 जुलै 2021 पर्यंत 100 बसेस आणि 26 ऑगस्ट 2021 पर्यंत राहिलेल्या 100 बसेस रस्त्यावर येणार आहेत. आजच्या संचालक बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सर्व संघटना, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.