Today’s Horoscope 29 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 29 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 29.01.2024.

शुभाशुभ विचार – वृद्धी दिन.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी. (चंद्रोदय 21.26 पुणे.)

राहू काळ – सकाळी 7.30  ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 18.57 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

आनंदी व उत्साही असा दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. प्रेम प्रकरणांना घरातील थोरांचे आशीर्वाद मिळतील. गृहिणी व्यक्तिमत्व विकासावर भर देतील.

वृषभ – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून आज घरी आराम करण्याचा तुमचा मूड असेल. थोडे मुलांच्या अभ्यासात डोकावणे गरजेचे आहे. आज आईचे मन दुखावू नका.

मिथुन – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकायला हवीत. अहंकारास लगाम घालून अनुभवींचे सल्ले घेणे गरजेचे आहे. हाडवर्क पेक्षा स्मार्टवर्क करणे आज हिताचे राहील. वादविवाद टाळावेत.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वक्तृत्वास व कर्तृत्वासही वाव मिळेल. अती स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. खरे बोलण्यापेक्षा आज गोड गोड बोलणेच  हिताचे राहील.

सिंह -( शुभ रंग – चंदेरी)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या आधारे कार्यक्षेत्रात तुमच्या यशाचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल

कन्या – ( शुभ रंग- लाल)

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने खर्च होईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. आज मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. वडीलधाऱ्यांचा मान राखायला हवा.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

वृश्चिक – ( शुभरंग – मोतिया)

कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे तुम्ही वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

धनु – (शुभ रंग- पांढरा)

आज आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान संभवते. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांशी नमते घेणे गरजेचे आहे. सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. दैव तुमच्या पाठीशी आहेच.

मकर – (शुभ रंग- आकाशी)

भागीदारीतील आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचे सल्ले देतील. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून.

कुंभ – (शुभ रंग- राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना मान मिळेल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी आज तुमच्या हातून घडेल.

मीन – ( शुभ रंग – डाळिंबी)

व्यावसायिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. कामाच्या व्यापात तुमचे तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.