Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात(Chinchwad) साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय देवधर, डॉ. जिग्नेश तसवाला, लायन प्रीतम दोशी, लायन आनंद मुठा, डॉ. अशोक कुमार पगारिया तसेच संस्थापक डॉ. ललितकुमार धोका, व्यवस्थापकीय संचालक डॉ. स्वप्नाली धोका, प्राचार्या विद्युत सहारे, प्राचार्य जितेंद्र खैरनार, शिक्षक व पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या पतसंचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक (Chinchwad)विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या. काही विद्यार्थ्यांनी विविध भाषेतून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी चित्त थरारक पिरॅमिड करत उपस्थितांची दाद मिळवली.

Pune : सारथी फाउंडेशनतर्फे तळजाईवर वृक्षारोपण; पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

संविधान म्हणजे काय आणि संविधानाचे महत्त्व दर्शवण्यासाठी उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीसीए मधील विजयी गटाला तसेच एमसीएफ कार्यक्रमात विजयी झालेल्या लेझीम पथकाला विजय चिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉ. स्वप्नाली धोका यांनी आभार मानले.

 

 

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.