Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज – कोयना धरण परिसरात रविवारी (दि. 28) भूकंपाचा धक्का(Koyna Dam Earthquake) बसला. हा भूकंप 3.1 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.

सुदैवाने या धक्क्यामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस सहा किलोमीटर(Koyna Dam Earthquake) अंतरावर होता. कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असतात. त्याची तीव्रता कमी असल्याने धरणाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. रविवारी देखील अशाच प्रकारे भूकंपाचा धक्का जाणवला.

Pune : सारथी फाउंडेशनतर्फे तळजाईवर वृक्षारोपण; पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.