Today’s Horoscope 29 October 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 October 2022

वार – शनिवार.

29-10-2022

 शुभाशुभ विचार – क्षयदीन

 आज विशेष- पांडव पंचमी, कड पंचमी.

 राहू काळ – सकाळी 9 ते 10.30 

 दिशा शूल – पूर्वेस असेल.

 आजचे नक्षत्र- ज्येष्ठा 9.06 पर्यंत नंतर मूळ.

 चंद्र राशी – वृश्चिक 9.06 पर्यंत नंतर धनु.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- केशरी )

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)

विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकायला हवीत. वाहन चालवताना बेसावध राहू नका.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज चैनी व विलास वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कर्क (शुभ रंग- हिरवा)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतात. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. आज प्रेम प्रकरणात मात्र फसवणूक संभवते. खेळाडूंनी सराव वाढवावा.

सिंह (शुभ रंग- पिस्ता )

काम कमी व दगदगच आज जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. रिकामटेकडी चर्चा आज वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

धंद्यातील येणी आकस्मिक रित्या वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल.

तूळ ( शुभ रंग- लाल)

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल अति उत्साहात घेतलेले काही निर्णय चुकू शकतात. प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शिवसेनेचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज गोड बोलूनच आपला स्वार्थ साधावा लागेल.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. क्षुल्लक गोष्टही फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.

मकर ( शुभ रंग- निळा )

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोरमंडळीशी काही वैचारिक मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस पूर्णपणे अनुकूल असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदमीने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

 

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.