Today’s Horoscope 30 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शुक्रवार. 30 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार –12.00 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – संकष्ट चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 12.08 पर्यंत नंतर मूळ.
  • चंद्र राशी – वृश्चिक 12.08 पर्यंत नंतर धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -निळा)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. कितीही राबलात तरी नोकरीत वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. बेकायदेशीर कृत्य टाळावीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता झाहे. हाताखालच्या लोकांना चांगली वागणूक द्या.

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. व्यवसायात मागण्या पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवणे गरजेचे आहे

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटतील. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. आज महत्वाच्या चर्चा विवाहविषयक बोलणी टाळा. पोटाची दुखणी असतील तर दुर्लक्षित करू नका.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. हौशी मंडळी तर आज चक्क कामावर दांडी मारून जीवाची मुंबई करतील. आज बरेच दिवसांनी तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. काही जणांचा चक्क ऑफिसला दांडी मारून घरी विश्रांतीचा मूड असेल.

तूळ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. आज दुनियादारी सोडा व फक्त स्वतःपुरते बघा. शेजारी आज  फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.
आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. आज हातात पैसा खेळता राहील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. हट्ट पूर्ण झाल्याने गृहलक्ष्मी व मुले समाधानी असतील. आज पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग- भगवा)

असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. काही लांबचे नातलग संपर्कात येतील.

कुंभ – ( शुभ रंग- मरून)

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. संतती बाबत आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. आज मित्रांना पार्टी देण्यासाठी मनापासून खर्च कराल. मस्त दिवस

मीन – ( शुभ रंग – नारंगी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. व्यवसाय करत असाल तर भिडस्तपणास लगाम घाला.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.