Today’s Horoscope 30 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज :आजचे पंचांग -Today’s Horoscope 30 October 2023जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-
वार – सोमवार.३०.१०.२०२३.

शुभाशुभ विचार- कृत्तिका वर्ज्य.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – कृत्तिका.

चंद्र राशी – मेष १०.२८ पर्यंत नंतर वृषभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून आज अनेक किचकट प्रश्न सहजच मार्गी लावाल.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )
महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. आज सुसंवाद गरजेचा असेल.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक वाढली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. आज सत्संगातूनच मनःशांती मिळू शकेल.

कर्क (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे.

सिंह (शुभ रंग-सोनेरी )
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कायद्याची चौकट मोडून चालणार नाही.

कन्या ( शुभ रंग- मरून)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा उपासनेत मात्र खंड नकोच.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तुमची तब्येत ही थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधल्या वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन मळगा. पत्नीच आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

धनु- (शुभ रंग- भगवा)
ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. काही येणे असतील तर आज मागायला लाजू नका. गृहिणी साठी अतिव्यस्त दिवस आहे.

मकर ( शुभ रंग- नीळा )
नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
आज घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज आनंदी व उत्साही दिवस.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष द्याल. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करावेत. विद्यार्थ्यांना आज अभ्यासाचा प्रचंड कंटाळा येईल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.