Today’s Horoscope 31 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार गुरुवार …. ​दि​.  31 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार –१५ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – गुरुपुष्यामृत.
  • राहू काळ – दुपारी ०१.०० ते ३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु १९.४९ पर्यंत नंतर पुष्य
  • चंद्र राशी – मिथुन १३.३८ पर्यंत नंतर कर्क.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. आज झालेल्या प्रवासातील ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

 

वृषभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. नवकवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. आशादायी दिवस.

मिथुन – (शुभ रंग- तांबडा)

तब्येत थोडी नरमच राहील. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल. विरोधक चुका काढायच्या प्रयत्नात असतील.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. बेरोजगारांनी रोजगारासाठी दूर गावी जाण्याची तयारी ठेवावी.
 

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील. प्रवासात किमती सामान सांभाळा.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नको. आज इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. वैवाहिक जीवनात थोडीफार कुरबूर संभवते. संध्याकाळचा वेळ पत्नीसाठी राखून ठेवा.

.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – (शुभ रंग- गुलाबी)

काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल. अतिस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग- लाल)

कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणांना घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज अति श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. कुटुंबियांच्या वाढत्या गरजा भागवाव्या लागतील. पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. प्रकृती उत्तम साथ देईल.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल. आज गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.