Today’s Horoscope 5 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 5 September 2022

सोमवार. 

05. 09. 2022

शुभाशुभ विचार – क्षयदिन.

आज विशेष – गौरी विसर्जन, आदुःख नवमी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मूळ 20.06 पर्यंत नंतर पूर्वाशाढा.

चंद्र राशी – धनु.

—————————————-

आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 5 September 2022

मेष- (शुभ रंग- निळा)

तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना शंभर टक्के दैवाची साथ राहील नोकरदारांना साहेबांची कृपादृष्टी लाभेल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

जे काय चाललंय ते बरंच चाललंय म्हणायचं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली वरी आज सासुरवाडी कडून एखाद्या लाभ होऊ शकतो.

मिथुन -(शुभ रंग- हिरवा)

वैवाहिक जीवनात आज सुसंवाद राहील. जोडीदारास दिलेले शब्द पाळावे लागतील. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा इतरांच्या भांडणात तुम्ही आज मध्यस्थी करायला जाल.

कर्क – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमच्या अथक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की लाभेल. यश जवळच येऊन ठेपले आहे.

सिंह- ( शुभ रंग – लाल)

मुलांचे वाढते हट्ट तुम्ही हौशीने पुरवाल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष असू द्या.

कन्या- ( शुभ रंग- मोतिया )

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढच होईल. घरात आज सज्जनांची येजा चालू राहील गृहिणी स्वतःचे छंद जोपासतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. आज गृह सौख्याचा दिवस.

तुळ – ( शुभरंग -स्ट्रॉबेरी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागेल. गृहिणींना शेजारधर्म पाळावेच लागतील. जवळपासच्या प्रवासात झालेल्या काही ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी कामी येतील.

वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)

आज धनस्थानातून चालत असलेले चंद्र भ्रमण तुमची आवक वाढवेल. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

धनु -(शुभ रंग – भगवा )

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मानसिक स्थिती ही उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकणार आहेत. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे.

कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी )

आज हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतिने ही तुम्ही भारावून जाल. स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी सढळ हस्ते खर्चही कराल.

मीन – ( शुभ रंग – मरून)

आज केवळ आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन- 9689165424.

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

CM Eknath Shinde : शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.