Moshi : मोशीमध्ये भांड्याच्या दुकानाला पहाटे लागली आग

एमपीसी न्यूज : मोशी (Moshi) येथील एका भांड्याच्या दुकानाला आज पहाटे आग लागण्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चिखली केंद्राने सांगितले, की आज पहाटे मोशी येथील भगवती स्टील सेंटर नावाच्या एका भांड्याच्या दुकानाला आग लागली होती. हे दुकान देहू-आळंदी रोडवरील भारतमाता चौका जवळ आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाचा एक अग्निशमन बंब व चिखली केंद्राचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला होता. अंदाजे 30 ते 45 मिनिटात आग विझवण्यात आली. सुदैवाने (Moshi) यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे दुकान 15 x15 फूटचे असून त्यामधील फर्निचर व भांडी जळाली आहेत.

Today’s Horoscope 5 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.