CM Eknath Shinde : शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

एमपीसी न्यूज : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोमवारी, 5 सप्टेंबरला  राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी 1 वा. पासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

Ganpati Visarjan : वाकड येथील द्रोपदा लॉन्स येथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौद

कोरोना संकटानंतर अलिकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह होणे अपेक्षित आहे.(CM Eknath Shinde) या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.