Indira Gandhi Railway Flyover : पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूलाच्या (Indira Gandhi Railway Flyover) दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्ती करण्याच्या कामामधील चौथ्या टप्प्यातील पिंपरी पूल ते पिंपरी पुलाच्या मध्यपर्यंत काम करण्याचे नियोजित आहे. त्याकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहे.

वाहतुकीत बदल – Indira Gandhi Railway Flyover

1) पिंपरी पुलावरून भाटनगरकडे जाणारी वाहतूक गोकुळ हॉटेल – शगुन चौक – कराची चौक – रिव्हर रोड – भाट नगर चौककडून पुढे लिंक रोडकडे जाईल.

2) भाटनगरकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक भाट नगर – रिव्हर रोड – कराची चौक – शगुन चौक – पिंपरी पुल – क्रोमा शोरूम – मोरवाडी चौक अशी राहील.

पिंपरी पुलाच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान पहिल्या टप्प्यातील भाटनगर बाजू कडील काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक रिव्हर रोड – शगुन चौक मार्गे राहील. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्पॅनवरील एका बाजूने दुहेरी वाहतूक चालू ठेवण्यात येईल.

3) पिंपरी गावामध्ये पिंपरी चौक व अहिल्यादेवी चौकाकडून येणाऱ्या बसेस एम्पायर इस्टेट- काळेवाडी मार्गे वळविण्यात येतील.

4) अवजड वाहनांना डेरी फार्म रोड मार्गे डीलक्स चौक तसेच महात्मा नगर मार्गे सकाळी 9 वा. ते रात्री 9 वा. पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.