Pimpri: राहण्यायोग्य शहरात औद्योगिकनगरी पिछाडीवर; सत्ताधा-यांनी अधिका-यांवर फोडले खापर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती भरताना विमानतळ व नियंत्रण कक्ष या सुविधांची माहितीच अधिका-यांकडून भरली गेली नाही. परिणामी, 15 गुण कमी झाल्यानेच, रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत पिंपरी-चिंचवड शहराची 69 व्या क्रमांकावर घसरण झाल्याचे सांगत सभागृह नेते एकनाथ पवार पिछाडीचे खापर अधिका-यांनर फोडले आहे. 

केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत 32.2 गुण मिळवत पिंपरी-चिंचवड शहर 69 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. याबाबत पवार म्हणाले की, दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांचा या योजनेत सहभाग करण्यात आला. केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाकडून या सर्वक्षणासाठी एक अर्ज भरुन घेण्यात आला.

यामध्ये शहरासाठी स्वतंत्र विमानतळ व नियंत्रण कक्ष आहे का ? अशी माहिती विचारण्यात आली होती. मात्र, आपल्या शहरातील नागरिकांना या दोन्ही सुविधा पुणे शहरातुन उपलब्ध होत आहेत. तसे नमुद करणे आवश्‍यक असताना, या सुविधाच उपलब्ध नसल्याचे या अर्जात नमूद केल्यानेच 15 गुणांची कपात झाली. अधिका-यांच्या चुकांमुळेच शहराचा क्रमांक खाली घसरल्याच्या दावाही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.