Tree Plantation: वीर सावरकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघातर्फ वृक्षारोपण

एमपीसी न्यूज: प्राधिकरणातील वीर सावरकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाचे पर्यावरण प्रमुख श्री सूर्यकांत मुथियान यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. (Tree Plantation) साडेतीनशे रोपे उद्यानात लावण्यात आली. दररोज सकाळी फिरायला येत असलेल्या जेष्ठांनी श्रमदान करून ही झाडे लावली.

 

प्राधिकरणातील वीर सावरकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज दि. 5 ऑगस्टला सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील नागरिकांनी पर्यावरण प्रमुख श्री सूर्यकांत मुथियान यांच्या पुढाकाराने जवळपास साडेतीनशे रोपे उद्यानात लावली. (Tree Plantation) या कामामध्ये उद्यान विभागाच्या अधिकारी व कर्मच्यांनीही मदत केली अशी माहिती ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे श्री. बोरकर सर यांनी दिली.

Child abuse: दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक शोषण करणाऱ्याला अटक

यावेळी श्री गणेश सोनटक्के, अशोक बाफना, सिद्राम शिरुरे, विनोद पटेल, शर्मा, तोमर, तळेकर, श्री गवळी, मापारी, थोरात यांच्यासह 50 व्यायाम प्रेमी लोकांनी  वृक्षारोपण करत श्रमदान केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.