Child abuse: दहा वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात स्त्री अत्याचारासह बाललैंगीक अत्याच्याराच्या गुन्ह्यांचा आलेखही दिवसेंदिवस वाढत आहे. (Child abuse) थेरगाव घटनेनंतर मोरवाडी परिसरातील लालटोपीनगर येथे दहा वर्षाच्या मुलावर दोन नराधमांनी गैरवर्तन करत मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. यातील एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

स्वप्नील नंद शिंदे (वय.25) याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार शुभम शिंदे हा फरार आहे.याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने पिंपरी पोलिसात गुरुवारी (दि.4) तक्रार दिली होती.

Student Suicide: FTII मध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षाचा मुलगा बुधवारी खेळत असताना आरोपींनी त्याला ते बसले असलेल्या रिक्षात बोलावून घेतले. मुलगा तेथे गेला असता त्याला पकडून दोघांनी त्याच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मुलाने लगेच आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली वेळ रात्री आठची होती. (Child abuse) त्यामुळे मुलाचा आवाज एकूण लोक जमा होताना पाहून त्यांनी मुलाला सोडून दिले.यावरून पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.