Pimpri : शहरात जोरदार पावसात उन्मळून पडली झाडे

एमपीसी न्यूज : पिंपरी (Pimpri) चिंचवड शहरात जोरदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने झाडे हटविण्याची कामे सुरू आहेत.

PCMC : नोकरी भरती! दोन केंद्रांवर कॉपी, पाच जणांविरोधात गुन्हा

तळवडे रस्त्यावर वादळ वाऱ्यामुळे झाडे पडले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, सेक्टर 22 या ठिकणी पोलीस चौकी या ठिकाणी देखील एक झाड पडले आहे. निगडी स्मशानभूमी रस्ता, निगडी श्रीकृष्ण मंदिर, कैलासवासी मधुकर पवळे क्रीडांगण या ठिकाणी झाड पडले आहेत.

अग्निशामक दल त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.