PCMC : नोकरी भरती! दोन केंद्रांवर कॉपी, पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) 388 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे रोजी राज्यातील 98 केंद्रांवर झालेल्या परीक्षेत दोन केंद्रांवर कॉपी झाल्याचे समोर आले. नाशिक केंद्रातील कॉपी प्रकरणी तिघांवर तर मुंबईतील कॉपी प्रकरणी दोन अशा पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. एकाने डिव्हाईस तर एकाने मोबाईल फोन केंद्रात नेला होता.

Pune : महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

महापालिकेच्या (PCMC) 15 पदांच्या 388 जागांसाठी राज्यातील 26 जिल्ह्यातील 98 केंद्रांवर परीक्षा पार पडली. त्यामध्ये नाशिक आणि मुंबईतील केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले आहेत.  नाशिक येथील कॉपी प्रकरणी राहुल मोहन नागलोथ, अर्जुन हारसिंग मेहेर, अर्जुन रामधन राजपूत अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मूळ उमेदवार हा महेर असताना त्याच्या जागी नागलोथ हा परीक्षेसाठी डमी बसला होता. महापालिकेचे अधिकारी नाना मोरे यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राहुल  हा बाहेर असलेल्या अर्जुन राजपूत याला डिव्हाईसद्वारे प्रश्न सांगत होता. अर्जुन त्याला उत्तरे सांगत होता. त्याच्या कानात डिव्हाईस सापडले. त्याच्याकडून दोन सिमकार्ड, 1 मेमरी कार्ड जप्त केले.

मुंबई येथील केद्रांवरील कॉपी प्रकरणी  पालिकेचे उप अभियंता संजय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सखाराम अंबादास बहिर (रा. शिरपूर, बीड) आणि आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सखाराम हा डिव्हाईसव्दारे कॉपी करत असल्याचे आढळून आले. त्याची अंगझडती घेण्यापूर्वीच आरोपीने मोबाईल खाली फेकून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.