Bhosari : बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत व्यावसायिकाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – बँकेचे कर्ज मंजूर झाले असून ते मिळविण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला 2 लाख 7 हजार 156 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार शांतीनगर भोसरी येथे 1 ते 20 ऑगस्ट 2019 या कालावधीत घडला. सायबर सेलकडून तक्रारी अर्ज आल्यानंतर शनिवारी (दि. 28 डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजितकुमार महेश्वर सिंग (वय 38, रा. शांतीनगर, भोसरी. मूळ रा. मिरजानगर, ता. महुआ, जि. वैशाली, बिहार) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9540859046, 9718280367, 9718602844 आणि [email protected] या मेल आयडीच्या वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9540859046, 9718280367, 9718602844 हे मोबाईल धारक आणि [email protected] या मेल आयडी वापरकर्त्याने फिर्यादी यांना फोन आणि मेलकरून खोटी ओळख सांगितली. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना बँकेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. सुजितकुमार यांनी ऑनलाईन माध्यमातून आरोपींना 2 लाख 7 हजार 156 रुपये पाठवले. मात्र, त्यांचे कर्ज मंजूर झाले नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे धाव घेत तक्रार केली. सायबर सेलने चौकशी करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास अहवाल दिला आहे. त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.